Monday, August 15, 2011

चला पुन्हा एक होऊया आणि जग जिंकुया...

 आज १५ ऑगस्ट.. ६५ वा स्वातंत्र्यदिन.. Independence Day चा Counter वाढला..
एवढी वर्ष उलटून गेली, एवढ्या गोष्टी घडून गेल्या, तरी अजुन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हटलं की पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टी चघळण्यास सुरूवात होते..


आज रस्त्यांवर तिरंगा विकणारी माणसं आणि उद्या १६ ऑगस्टला त्याच तिरंग्यांचा रस्त्यावर झालेला कचरा उचलणारी मणसं हे चित्र भारतीयांसाठी काही नवीन नाही.. TV वरच्या प्रत्येक कार्यक्रमातही देशभक्ती वाहू लागते.. खरंच बाकीचे ३६४ दिवस आपल्याला देशभक्ती आठवत नाही का?

रस्त्यावर ठिकठिकाणी झेंडावंदन, ते पण कोणत्या तरी political party तर्फे.. बाजूला पार्टी आणि त्या पार्टीच्या नेत्याच्या नावाचं होर्डिंग मात्र नक्की असतं.. बहुतांशी सार्वजनिक ध्वजारोहण सोहळे हे राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनच का केले जातात हे एक कोडंच आहे..

भगतसिंग, सुखदेव, टिळक, आगरकर अश्या थोरामोठ्यांबद्दल काहीही माहित नसताना दुस-यांनी लिहीलेली आणि १ दिवस पाठांतर करून दिलेली भाषणं ऐकून वीट आलाय.. पण अश्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना त्यांनी केलेल्या कार्याची आणि बलिदानाची जाणीव खरंच असते का?

पुरातनकाळापासून चालत आलेली देशभक्तीपर गीते.. दरवर्षी तीच तीच ऐकून त्यांचाही कंटाळा आलाय.. पण मग आज काल देशभक्तीपर गीते का होत नाहीत? ह्याचं कारण खरंतर शोधायला हवं.. ह्या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत..

आज काल तर काय म्हणे १५ ऑगस्टच्या दिवशी Red Alert आणि High Security असते.. हे तर म्हणजे स्वातंत्र्यदिनीसुध्दा पारतंत्र्यात असल्याची जाणीव करून देण्यासारखं आहे.. फक्त १५ ऑगस्टच्या दिवशी high security ठेवली म्हणजे आपला देश खरंच सुरक्षित आहे / राहतो का? अश्या महत्त्वाच्या दिवशी High Security आणि Red Alert का द्यावा लागतो ह्याची करणं आधी शोधायला हवीत..

माझ्यात तेवढी कुवत नाही आणि ताकदही नाही कि ह्या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा करता येईल.. पण खारीचा वाटा उचलण्याची आणि तो पेलण्य़ाची क्षमता नक्कीच आहे.. ६४ वर्षांनंतरही आपल्या देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालंय असं काही वाटत नाही.. पण ह्या पुन्हा जन्माला आलेल्या स्वातंत्र्य लढ्यात मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंसारख्यांना माझी साथ नक्कीच असेल ह्यात दुमतही नाही..


चला पुन्हा एक होऊया आणि जग जिंकुया.. खरं तर आधी आपल्याला आपली माणसं जिंकायची आहेत.. ती जिंकली की जग सारं आपलंच आहे.. Let's Unit and Fight Against All Bad Tendancies and False Values in the society..
ह्या वेळी मला आमची एक प्रार्थना आठवते.. नववीत असताना आमच्या सहस्त्रबुद्धे बाईंनी शिकवली होती. आम्ही ती रोज म्हणायचो.. पण त्याचा खरा अर्थ आत्ता लागतोय..

                                   We stand as one family
                                   Bound to each other with love and respect.

                                   We serve as an army,
                                   Courageous and disciplined
                                   Ever ready to fight against all low tendencies and false values
                                   Within and without us.

                                   We live honestly
                                   The noble life of sacrifice and service.
                                   Producing more than what we consume
                                   and giving more than what we take.

                                   We seek the Lord's grace
                                   To keep us on the path of virtue, courage and wisdom.

                                   May Thy grace and blessings flow
                                   through us to the world around us.

                                   We believe that the service of our country
                                   is the service of the Lord of Lords,
                                   and the devotion to the people
                                   is the devotion to the Supreme Self.

                                   We know our responsibilities,
                                   give us the ability and courage to fulfill them.


                                   OM    TAT   SAT !!!
                                 
                                   ( A Prayer by Chinmay Mission...!!! )

-मंगेश केळकर
(१५ ऑगस्ट २०११)

Wednesday, July 20, 2011

पाऊस, खड्डे आणि राजकारण...!!!


खरं तर पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे निसर्गाचे सौंदर्य या सगळ्यांवर आजतागायत भरपूर लिखाण झालं, कित्येक गाणी किंवा कविता झाल्या. सगळ्याच HIT झाल्या असं नाही पण if we count this number, it can definitely create a World record. आजवर इतर कुठल्याही भाषेत, इतर कुठल्याही विषयावर एवढं लिखाण झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही...
पण सद्य परिस्थीती काहीशी वेगळी आहे. सध्या पाऊस, श्रावण आणि त्यासोबत येणारे नैसर्गिक (किंवा कृत्रिम) खड्डे यांवर जेवढया चर्चा, विवाद आणि राजकारण होतं त्यापुढे कुठल्याही जगातला कुठलाही World Record फिकाच पडेल याबद्दल दुमत नाही.


पाऊस पडला नाही ह्याला जबाबदार कोण? तर कोणता तरी राजकीय पक्ष.. का तर म्हणे ह्यांच्या काळात वृक्षारोपण कमी झालं..
पाऊस जास्त झाला आणि पूर सदृश्य परिस्थीती झाली तरीही जबाबदार राजकीय पक्षच.. का तर म्हणे पाण्याचा निचरा करण्याची योजना चुकीची होती..
राजकारणीही तितकेच चलाख.. आपलं खापर दुसर-या नेत्यावर किंवा राजकीय पक्षावर फोडून मोकळे होतात..
किंवा एक ठरलेलं उत्तर म्हणजे कंत्राटदार..

मग विरोधी पक्षाचे सरकारवर ताशेरे.. मग सरकार कडून कोट्यावधी रुपयांची मंजुरी (फक्त खड्डे बुजवण्यासाठी किंवा ते दुरुस्त करण्यासाठी)..
आकडेवारी तर खरंच थक्क करून टाकणारी आहे.. २५०० खड्डे दुरुस्त करायला सरकारचं करोडो रुपयांचं budget ?? Expert Economistsना पण कठीण जाईल असं हे अर्थकारण राजकारणीच खेळू शकतात.. सत्ता आणि पैसा यांच्यासाठी हपापलेली ही राजकारणी मंडळी आपल्या खिशाचे खड्डे भरण्यासाठी अर्थकारणाची सगळी समीकरणंच बदलून टाकतात..

कंत्राटदार आणि राजकीय नेते (किंवा पक्ष) यांचे लागे-बांधे असल्याशिवाय ह्या गोष्टी कश्या शक्य आहेत ?? २००७ साली केलेल्या एखाद्या प्रस्तावाला किंवा tender ला २०१० किंवा ११ मध्ये मंजुरी मिळते हया आणि अश्या अनेक गोष्टी, यांचा अर्थ कसा लावावा ?? ज्याप्रमाणे पुर्वी "पाणी पण विकलं जईल" हा विचार कधी कोणी केला नव्हता त्याच प्रमाणे "पावसाळ्यातल्या रस्त्यांवरील खड्यांवर राजकारण आणि भ्रष्टाचार होईल" हाही विचार कदचित आधी कोणी केला नसेल..
मुंबई (आपल्या देशाची आर्थिक राजधानी), पुणे (विद्येचं माहेरघर), नाशिक - या आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सारखीच परिस्थीती आहे.. खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा की रस्त्यांवर खड्डे हा प्रश्न खरंच हैराण करून सोडणारा आहे.

खरं तर हे सगळंच खूप हास्यास्पद आहे.. पण शेवटी राहता राहतो एकच प्रश्न "RESPONSIBILITY" चा.. ह्या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची, त्यांची डागडुजी कोण करणार, Budget किती, कंत्राटदार कोण / कुठले, Tenders कोणती / कोणाची - ह्या सगळ्यांची उत्तरं मिळेपर्यंत अजुन १-२ पावसाळे आरामात निघुन जातात.. मग २ वर्षांनी पुन्हा तेच.. and it goes on..!!! पुन्हा ये रे माझ्या मागल्या...!!!

खरंच, हे पाऊस, खड्डे आणि राजकारण ह्यांचं त्रिकुट अजरामर आहे...!!!

-मंगेश केळकर
(२० जुलै २०११)

Wednesday, July 13, 2011

१३ जुलै २०११, आज पुन्हा एकदा मुंबापुरीला bomb blastsनी हादरवून सोडलं...

१३ जुलै २०११, आज पुन्हा एकदा मुंबापुरीला bomb blastsनी हादरवून सोडलं. दादर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलंय..!!


नेहमी मुंबई, ठाणे आणि पुणे यावरून वाद घालणारा मी आज पुन्हा एकदा हळहळलो. मुंबई पेक्षा ठाणे आणि पुणे prefer करण्याचं अजुन एक reason आज मला मिळालं होतं खरं, पण ह्या वेळी १ reason वाढल्याचा आनंद झाला नाही..
Spirit - Spirit च्या नावाखाली भरपूर सोसलं आहे मुंबईने..अजुन किती दिवस मुंबई हे सगळं सहन करणार?
"बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है" असं म्हणत बसून किंवा ह्या गोष्टींवरून राजकारण करून कहीही होणार नाहीये हे माहीत असून सुद्धा कुठलीच action घेतली जात नाही ह्या बद्दल खरं तर खंत व्यक्त केली पहिजे.

जगातलं so called "One Of the best Police department" म्हटलं जाणारं मुंबईचं पोलीस खातं, कुठे आणि काय खात बसलं आहे ही खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
news channelsना एक news मिळाली. सनसनाटी खबर. मग channels मध्ये चुरस.
राजकारणी लोकांना राजकारण समाजकारणात गुरफटण्याची अजुन एक संधी मिळाली.
पोलीस खात्याला अजुन एक Challenge मिळाला आणि आतंकवादाला मुंबापुरीशी छेडखानी करण्याचं समाधान मिळालं.

पण ह्या सगळ्यांत पुन्हा एकदा फरपट झाली ती सामान्य माणसाची. सकाळी officeला गेलेला रात्री घरी परतेल की नाही ह्याचीही त्याला खात्री राहिलेली नाही.
मुंबईला जिवंत ठेवण्यासाठी हा माणूस अजुनही मरतोय. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांची सांगड घालता घालता नाकी नऊ आले तरीही सकाळी भाऊगर्दीमध्ये धक्के खात खात ७:२१ ची लोकल अगदी वेळेत गाठतोय. ह्या भाऊगर्दीमध्ये तो कधी हरवून गेलाय हे देखील त्याला कळलं नाही.
Bomb Blasts, दंगल, दगडफेक, लाचखॊरी ह्या सगळ्या गोष्टींना त्यानी conveniently आपलसं करून घेतलंय. A PART & PARCEL OF LIFE. ही कदाचित त्याची मजबुरी असेल किंवा So Called "SYSTEM" ची भिती. Survival of the Fittest च्या नावाखाली स्वतःला prove करताना अश्मयुगातील माणसापेक्षाही जास्त मागे पडत चालला आहे. I can explain his state of mind in just one word - "CONFUSED".
अश्यावेळी अवधुत गुप्ते च्या गाण्यातल्या २ ओळी आठवतात -

"मंजिलॊंकी मुझकॊ तलाश है, पर पता नही किस तरफ़ बढूं
हाथ में मेरे तलवार है, पर पता नही के किससे लढूं"

मनात हजार प्रश्न, हजार शंका पण उत्तर कसलेच नाही. त्याची स्थिती सध्या अभिमन्यु सारखी झाली आहे. चक्रव्युहात पुरता अडकून गेला आहे.
आता मनात एकच आशा आहे की २०११ सालात तरी ह्या अभिमन्युला चक्रव्युहातून आपली सुटका करता यावी.....!!!!

शेवटी मी ठाणेकर असल्याचा कितीही अभिमान असला तरीही आज at the end of the day my heart says - Hats off to मुंबईकर...

-मंगेश केळकर